आषाढी वारीची घोषणा, या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार संतांच्या पालख्या

Palkhi of Saint Tukaram Maharaj and Saint Dnyaneshwar Maharaj to go to Pandharpu for Ashadi Wari
Palkhi of Saint Tukaram Maharaj and Saint Dnyaneshwar Maharaj to go to Pandharpu for Ashadi Wari

देहू संस्थांनने आषाढी वारीची घोषणा केली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूर मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार असून 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा आज (रविवारी) झाली. यंदा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोना ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक आहेत. आषाढी वारीची गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकाराम तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाची आणि विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.