हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्व सांगण्यात आले आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. यापैकीच आषाढ महिन्यातील एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींची पापा पासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात संपन्नता येते.
परमा (कमला) एकादशी तिथी
एकादशी व्रत शनिवार, 12 ऑगस्ट रोजी असेल.
एकादशी तिथी प्रारंभ : 11 ऑगस्ट सकाळी 7 : 36 मिनिटांपासून
एकादशी तिथी समाप्ती : 12 ऑगस्ट सकाळी 8 : 03 पर्यंत असेल.
परमा (कमला) एकादशीला करु नका ‘या’ चूका
एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते.अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.
- केस आणि नखे कापू नये
एकादशीच्या दिवशी केस किंवा नखं कापू नये, शास्त्रानुसार यामुळे व्यक्तीला दुर्भाग्याचा सामना करावा लागू शकतो.
- तुळशीला स्पर्श करु नये
एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करु नये तसेच तुळशीची पानं देखील तोडू नये.
- भात खाऊ नका
शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते.
- मीठाचे सेवन करू नका
शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे.
- मांसाहार करू नका
शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा. तसेच एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.