Sunday, April 21, 2024
घरमानिनीReligiousमीन : खूप आध्यत्मिक असतात या राशीचे लोक

मीन : खूप आध्यत्मिक असतात या राशीचे लोक

Subscribe

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव, गुण तसेच राशीचा ग्रह स्वामी सांगितला जातो. ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी सर्वात शेवटच्या मीन राशीच्या व्यक्तींबद्गल सांगणार आहोत.

- Advertisement -

मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यामुळे या राशीचे व्यक्ती खूप धार्मिक आणि आशावादी असतात. या व्यक्तींचा स्वभाव शांत आणि दयाळू असतात. या व्यक्तींना नेहमी कल्पनेत जगायला आवडते. या राशीचे लोक खूप रोमँटिक आणि भावूक असतात. या व्यक्तींचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते.

मीन राशीच्या व्यक्तींचे अवगुण

या राशीचे व्यक्ती खूप हट्टी आणि संवेदनशील असतात. शिवाय कधी-कधी चंचल होतात. हे व्यक्ती कधी-कधी खूप आळशी देखील होतात ज्यामुळे त्यांची अनेक कामे रखडतात. हे व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवरुन नाराज होतात.

- Advertisement -
मीन राशींच्या व्यक्तींनी करा या देवाची पूजा

मीन राशीच्या व्यक्तींनी श्री विष्णूंची आराधना करावी. दररोज ऊँ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा.

 


हेही वाचा : कुंभ : खूप कठोर असतात या राशीचे लोक

- Advertisment -

Manini