Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligiousPitru Paksha 2023 : पितृपक्षामध्ये कावळ्यांनाच का दिले जाते जेवणाचे पान?

Pitru Paksha 2023 : पितृपक्षामध्ये कावळ्यांनाच का दिले जाते जेवणाचे पान?

Subscribe

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. पितृपक्षात कावळ्यांना देखील महत्वपूर्ण मानले जाते. मात्र या मागे नक्की काय कारण आहे? हे आज आपण जाणून घेवू

- Advertisement -

कावळ्यांना का मानलं जातं पित्तर?

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षामध्ये पित्तर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. शास्त्रामध्ये या गोष्टीचे वर्णन केलं गेलं आहे की, समुद्र मंथनावेळी देवतांसोबत कावळ्यांनी देखील अमृत प्राशन केले होते. ज्यानंतर असं मानलं जातं की, कावळ्यांचा मृत्यू कधी नैसर्गिक रित्या होत नाही. तसेच कावळा कितीही प्रवास केला तरी थकत नाही. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचा आत्मा कावळ्याच्या शरीरामध्ये वास करू शकते आणि एकाजागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकते. याचं कारणामुळे पितृपक्षामध्ये कावळ्यांना जेवण दिले जाते. तसेच, धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा कोणत्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तेव्हा त्याचा जन्म कावळ्याच्या योनीमध्ये होतो. या कारणामुळेच कावळ्यांच्या माध्यमातून पितरांना जेवण दिले जाते.

कावळ्या व्यतिरिक्त यांना सुद्धा दिलं जातं पितृपक्षात जेवण

पितृपक्षामध्ये फक्त कावळ्यालाच नाही तर गाय, कुत्रा यांना सुद्धा जेवण दिलं जातं. असं म्हणतात की, कावळा किंवा कुत्रा आणि गायीकडून आपणं दिलेलं जेवण स्वीकार केलं गेलं नाही. याचा अर्थ आपले पित्र आपल्यावर नाराज आहेत.

- Advertisement -

कावळा आणि पितृपक्ष वाचा पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एके दिवशी इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले होते. त्या कावळ्याने एके दिवशी सीतेच्या पायावर चोच मारली होती. या पूर्ण घटनेला प्रभू श्रीरामांनी पाहिलं. त्यावेळी त्यांनी एका निशाण्यावर कावळ्याचा एक टोळा फोडला. त्यानंतर त्या कावळ्याने श्रीरामांची माफी मागितली. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी त्याला वरदान दिले की, पितृपक्षामध्ये कावळ्याला दिलेले जेवण पितृलोकामध्ये निवास करणाऱ्या पितरांना प्राप्त होईल.


हेही वाचा :

Parivartini Ekadashi : आज परिवर्तिनी एकादशीला श्री विष्णूंसोबत बाप्पाची देखील करा पूजा

- Advertisment -

Manini