Monday, October 2, 2023
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना ‘हा’ मंत्र म्हटल्याने; भावाला लाभेल दीर्घायुष्य

Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना ‘हा’ मंत्र म्हटल्याने; भावाला लाभेल दीर्घायुष्य

Subscribe

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी पंचक आणि भद्रा निर्माण होत आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरा केला जाईल.

शुभ मुहूर्तावर रक्षाबंधनाचा सण साजरा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तासोबतच योग्य दिशा पाहणं देखील महत्वाचं आहे. सोबतच राखी बांधताना भावाच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी काही मंत्र देखील म्हणायला हवे.

राखी बांधण्यापूर्वी घ्या या गोष्टींची काळजी

- Advertisement -

The Trend of Women Tying Rakhis to Their Sisters-In-Law Catching Up

शास्त्रानुसार, राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. तर भावाची पाठ पश्चिम किंवा दक्षिणेकडे असावी. राखी बांधण्यापूर्वी भावाच्या डोक्यावर रूमाल किंवा टोपी जरूर ठेवा.

राखी बांधताना करा या मंत्राचे पठण

- Advertisement -

The Raksha Bandhan (or Rakhi) Festival

येन बद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल:।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल।
ॐ व्रतेन दीक्षामाप्नोति, दीक्षयाऽऽप्नोति दक्षिणाम् ।
दक्षिणा श्रद्धामाप्नोति, श्रद्धया सत्यमाप्यते ॥

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

या वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्टला दिवसभर भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे 30 ऑगस्टला रात्री 9 नंतर ते 31 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.


हेही वाचा :

श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ

- Advertisment -

Manini