श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. बहिण-भावाचं हे गोड नातं अधिक घट्ट करण्यासाठी तसेच भावामागची इडापिडा दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही विशेष उपाय सांगणार आहोत.
रक्षाबंधनचा विशेष उपाय
- रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधल्यानंतर श्री हनुमानाला देखील राखी बांधावी. यामुळे श्री हनुमान तुमच्या भावाचे आणि तुमचे नेहमी रक्षण करतील. असं म्हणतात या उपायाने भावामागची इडापिडा देखील दूर होण्यास मदत होते.
- रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधून झाल्यानंतर दोघांनी मिळून हनुमान चालीचेसे पठण करावे.
- रक्षाबंधनच्या दिवशी बहिण-भावाने एकमेकांवर चिडू नये. यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव पडतो.
- रक्षाबंधनच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्या, यामुळे बहिण-भावाच्या नातं अधीक घट्ट होईल.
रक्षाबंधन तिथी
- Advertisement -
यंदा 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार असून
रक्षाबंधन तिथी 30 ऑगस्ट सकाळी 10:58 पासून ते 31 ऑगस्ट सकाळी 07:05 पर्यंत असेल.
- Advertisement -