Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन दिनी 'या' तीन कथा वाचायलाच हव्यात

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन दिनी ‘या’ तीन कथा वाचायलाच हव्यात

Subscribe

यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरे केले जाईल. रक्षाबंधनचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा वेगळेपण सांगणारा हा सण प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खास असतो. रक्षाबंधन संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रक्षाबंधन संबंधित पौराणिक कथा

- Advertisement -

प्रचलित पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू राजा बळीसोबत पाताळ लोकात राहायला गेले तेव्हा देवी लक्ष्मीला काळजी वाटली. आपल्या पतीला परत आणण्यासाठी नारमुनींनी देवी लक्ष्मीला राखी बांधून राजा बळीला तुझा भाऊ बनवण्यास सांगितले आणि भगवान विष्णूला वरदान मागितले. देवी लक्ष्मीने वेश धारण करून राजा बळीला राखी बांधली आणि विष्णूचा शोध घेतला. योगायोगाने त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून भावा-बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा केला जाऊ लागला, असे मानले जाते. या सणाची सुरुवात देवी लक्ष्मीने सर्वप्रथम राखी बांधून केली होती.

दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, महाभारत काळात श्रीकृष्णाने राजा शिशुपालाचा 100 वेळा शिवीगाळ करून सुदर्शन चक्राने वध केला होता. त्यामुळे त्यांच्या बोटातून रक्त वाहू लागले. त्या वेळी द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. यानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले.

- Advertisement -

history of rakhi

एका पौराणिक कथेनुसार, सतयुगात असुर आणि देवतांच्या युद्धात असुरांचे फार वर्चस्व होते, त्यामुळे इंद्राची पत्नी शचीला पती आणि देवतांची चिंता वाटू लागली. यादरम्यान तिने इंद्राचे रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली संरक्षणात्मक धागा तयार केला. तेव्हापासून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी हातात धागा बांधला जातो.

 


हेही वाचा :

Raksha Bandhan 2023 : भारताच्या विविध राज्यांत ‘या’ नावाने साजरी केले जाते रक्षाबंधन

- Advertisment -

Manini