श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यावर्षी 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधन साजरा केला जाईल. यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे. परंतु तुम्ही ऐकलं असेल की, रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं.
भद्रा काळ म्हणजे काय?
पुराणांमध्ये, भद्राचे वर्णन शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची कन्या असे केले आहे. भद्रा देखील शनिप्रमाणे स्वभावाने कठोर आहे. ब्रह्म देवाने तिला कलनशास्त्रात (पंचांग) विशेष स्थान दिले आहे. हिंदू पंचांग 5 मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहे ज्यामध्ये तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण आहे. त्यातील 11 करण त्यांपैकी 7 व्या करण व्यष्टीचे नाव ‘भद्रा’ आहे. भद्रा काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी राखी देखील भद्रा काळात बांधू नये.
भद्राकाळात राखी बांधल्याने रावणाचा झाला विनाश
असं म्हटलं जातं की, रावणाची बहिण शूर्पणखाने देखील रावणाला भद्रा काळामध्ये राखी बांधली होती. रावणाचे साम्राज्य संपण्यामागे हाच भद्रा काळ आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी रावणाची बहिण शूर्पणखेने भद्रा काळात रावणाला राखी बांधली आणि त्यानंतर लंकेच्या विनाशाला सुरूवात झाली होती.
कधी आहे भद्रा काळ?
30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:59 पासून श्रावण शुक्ल पौर्णिमा सुरू होईल. श्रावण पौर्णिमेसोबतच भद्रा काळ देखील सुरु होईल. जो 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 वाजता समाप्त होईल. त्यानंतर शुभ मुहूर्त सुरू होईल.
त्यामुळे 30 ऑगस्ट 2023 रोजी राखी बांधायची असेल तर रात्री 9.15 नंतरच बांधावी. तसेच तुम्ही 31 ऑगस्टला देखील रक्षाबंधन साजरी करु शकता. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.