ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील सप्तम भाव वैवाहिक जीवनाशी संबंधीत असतो. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये प्रेम विवाह कुंडलीच्या सप्तम भावावरुनच ओळखळा जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा सप्तमेश तृतीय, पंचम, नवम, एकादशी आणि बाराव्या घरात येतो. त्यावेळी व्यक्तीच्या कुंडलीमध्ये प्रेम विवाहाची शक्यता निर्माण होते. परंतु जर कोणाच्या कुंडलीत हा योग नसेल, तर प्रेम विवाह करण्यासाठी आणि वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही काही चमत्कारी उपाय जरुर करा.
प्रेम विवाहासाठी ‘हे’ उपाय करा
- Advertisement -
- शुक्रवारी राधा-कृष्ण मंदिरात जा आणि आपल्या प्रेम विवाहासाठी श्रीकृष्णाकडे मागणी करा.
- तुमचे प्रेम संबंध मजबूत करण्यासाठी “ओम क्लीं कृष्णाय नमः” या मंत्राचा जप करा.
- तसेच प्रत्येक गुरुवारी तुम्ही श्री लक्ष्मी नारायण मंत्राचे पठण करा.
- वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्यासाठी गुरुवारी पती-पत्नीने श्री विष्णूंची पूजा करावी.
- आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचे असेल तर प्रत्येक सोमवारी उपवास करा आणि या दिवशी आवर्जून महादेवाच्या मंदिरात जा.
- सोमवारी शंकराच्या पंचाक्षर मंत्राचे पठण करा आणि पिंडीवर बेलाचे पान अर्पण करा.
हेही वाचा :
Vastu Tips : आर्थिक नुकसान करणारी ही झाडे तुमच्याही घरात आहेत का?
- Advertisement -
- Advertisement -