Saturday, February 17, 2024
घरमानिनीReligiousकाळभैरव जयंतीला काळभैरव अष्टकाचे पठण केल्याने होतात अनेक फायदे

काळभैरव जयंतीला काळभैरव अष्टकाचे पठण केल्याने होतात अनेक फायदे

Subscribe

यंदा 5 डिसेंबर रोजी काळभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. कालभैरव हे भगवान शंकरांच्या रुद्र अवतारातील एक स्वरुप आहे. त्यामुळेच काळभैरव जयंती शिव भक्त मोठ्या आनंदाने साजरी करतात. हिंदू धर्मात देवी-देवातांच्या पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. आज आम्ही तुम्हाला काळभैरव अष्टक स्तोत्राचे पठण करण्याचे फायदे सांगणार आहोत.

काळभैरव अष्टकाचे फायदे

- Advertisement -
  • रविवार आणि कालाष्टमी तसेच काळभैरव जयंतीला कालभैरवाची पूजा करणं अत्यंत फलदायी मानले जाते.
  • दररोज काळभैरव अष्टकाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात.
  • ज्या व्यक्तीला नकारात्मक शक्ती आणि शत्रूंचा त्रास असेल तर त्यांनी काल भैरव अष्टकचा पाठ करावा.
  • कालभैरवाची पूजा केल्याने न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय प्राप्त होतो. तसेच यामुळे शनिचा प्रकोपही शांत होतो.
  • कालभैरव अष्टकाच्या पठणाने नवग्रहांचा दोष लागत नाही.
  • कालभैरव अष्टकाच्या पठणाने व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते. तसेच आपले उच्चार स्पष्ट होतात.

काळभैरव अष्टक पठण करण्याचा विधी

  • धार्मिक ग्रंथानुसार रात्री आठ नंतर काळभैरव स्तोत्र पठण करणे उत्तम मानले जाते. रात्री शक्य नसल्यास तुम्ही सकाळी देखील या स्तोत्राचे पठण करु शकता.
  • काळभैरव अष्टक पठण करण्यापूर्वी घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या स्तोत्राचे पठण करावे.
  • स्तोत्र पठण करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये.
  • स्तोत्र पठण करताना मग एकाग्र करावे.

हेही वाचा :

Kaal Bhairav Jayanti 2023 : कधी आहे कालभैरव जयंती? जाणून घ्या शुभ मुहूर्त

- Advertisment -

Manini