Thursday, April 25, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : घरामध्ये घंटी वाजवण्याचे आहेत अनेक चमत्कारी फायदे

Vastu Tips : घरामध्ये घंटी वाजवण्याचे आहेत अनेक चमत्कारी फायदे

Subscribe

हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या पूजेला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. फक्त देवी-देवताच नाहीत तर शंख, घंटा, डमरु यांसारख्या वाद्यांची देखील पूजा केली जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक घरात देव पूजेदरम्यान घंटानाद केला जातो. परंतु यामागे नक्की काय महत्त्व आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असं म्हणतात की, पूजेदरम्यान घंटा वाजवल्याने देवी-देवता जागृत होतात आणि आपली प्रार्थना ऐकतात. परंतु घंटी वाजवण्यामागे धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक कारण देखील आहे.

घंटी वाजवण्याचे वैज्ञानिक महत्त्व

8 Spiritual Meanings When You Hear A Bell Ringing Out Of Nowhere

- Advertisement -

वैज्ञानिकांच्या मते, घंटी वाजवल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारते. घंटीचा ध्वनीनाद दूर पर्यंत जातो. ज्यामुळे त्यावेळी वातावरणातील जीवाणु, विषाणु आणि सूक्ष्म जीव नष्ट होतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध होते.

घंटी वाजवण्याचे धार्मिक महत्त्व

Why do we ring Bell in a Temple?

- Advertisement -
  • असं म्हणतात की, घंटी वाजवल्याने देवतांसमोर आपली उपस्थिती लागते. तसेच यामुळे देवी-देवतांच्या मूर्तीमध्ये चेतना जागृत होते.
  • घंटीच्या आवाजाने मन आणि डोक्याला शांती मिळते. मंदिरातील घंटी वाजवल्याने मानवाच्या अनेक जन्माचे पाप नष्ट होतात.
  • जेव्हा या सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा जो नाद घुमला होता, तोच आवाज घंटी वाजवल्यावर येतो. हा नाद ओंकार उच्चारणाने देखील जागृत होतो.

हेही वाचा :

Vastu Tips : पूजेमध्ये का गरजेचा आहे शंख? जाणून घ्या प्रकार आणि फायदे

- Advertisment -

Manini