Monday, March 17, 2025
HomeमानिनीReligiousDnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Dnyaneshwari Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणे काम बागुल ऐकेल। हे आशा सियारी देखैल।
तरि जीवा टेंकैल। म्हणौनि बिहे॥
तो म्हणतो की माझे अंत:करण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचे त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले, तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंत:करणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण.
सचेतनीं वाणेपणें। देहासकट आटणें।
संयमावरीं करणें। बुझूनि घाली॥
चित्ताचा संकोच होण्याकरिता देहसुद्धा झिजतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो.
मनाच्या महाद्वारीं। प्रत्याहाराचिया ठाणांतरीं।
जो यम दम शरीरीं। जागवी उभे॥
या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्‍याच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो.
आधारीं नाभीं कंठीं। बंधत्रयाचीं घरटीं।
चंद्रसूर्य संपुटीं। सुये चित्त॥
गुद व मेढ यांच्या मध्यभागी आधारचक्राचे ठिकाणी मूळबंधाची व नाभीमध्ये मणिपूर चक्राचे ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठात विशुद्ध चक्राचे ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची गस्त घालतो आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो.
समाधीचे शेजेपासीं। बांधोनि घाली ध्यानासी।
चित्त चैतन्य समरसीं। आंतु रते॥
समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो.
अगा अंतःकरणनिग्रहो जो। तो हा हें जाणिजो।
हा आथी तेथ विजयो। ज्ञानाचा पैं॥
अर्जुना अंत:करण निग्रह जो म्हणतात तो हा हे समज व येथे हाच ज्ञानाचा विजय आहे.
जयाची आज्ञा आपण। शिरीं वाहे अंतःकरण।
मनुष्याकारें जाण। ज्ञानचि तो॥
ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज.
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एवच।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥
इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, कर्माचे विषयी अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यू-जरा, व्याधी यांच्या ठिकाणी दु:खाचे व दोषाचे अनिदर्शन आहे.
आणि विषयांविखीं। वैराग्याची निकी।
पुरवणी मानसीं कीं। जिती आथी॥
आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैर चांगला जिवंत पुरवठा असतो.
वमिलिया अन्ना। लाळ न घोंटी जेवीं रसना।
कां आंग न सूये आलिंगना। प्रेताचिया॥
ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरिता कोणीही अंग पुढे करीत नाही.

Manini