Wednesday, April 24, 2024
घरमानिनीReligiousशरीर पुरुषाचे पण मन स्त्रीचे, सखी संप्रदाय म्हणजे काय?

शरीर पुरुषाचे पण मन स्त्रीचे, सखी संप्रदाय म्हणजे काय?

Subscribe

शरिर पुरुषांचे पण वेश स्री चा, तसेच नखापासून ते केसांपर्यंत श्रृंगार, लांब घुंगट, हातात बांगड्या आणि भांगात सिंदूर. या व्यतिरिक्त त्यांचे हावभाव सुद्धा स्रियांसारखेच असते. या व्यतिरिक्त त्यांना ना घर, परिवार असते. केवळ ते कृष्णालाच आपले पती, स्वामी आणि भगवान ही मानतात. त्यांची सेवा म्हणजेच त्यांचे आयुष्य असे ते मानतात. खरंतर हे सर्वकाही सखी संप्रदायातील लोक असतात. जे कृष्णाची सखी बनून त्याची उपासना करतात. पण ते असे का करत असलीत याच बद्दल आम्ही तुम्हाला अधिक सांगणार आहोत.

सखी संप्रदाय एखाद्या वेद-वेदांतचे विशेष विचार किंवा परंपरेचा प्रचार करत नाही. केवळ सगुण कृष्णाचीच उपसना ते करतात. कृष्णच त्यांच्या उपासनेचे कारण असते.

- Advertisement -

सखीभाव संप्रदायाचे संस्थापक
स्वामी हरिदास जी यांनी सखी संप्रदायाची स्थापना केली होती. आधी हरिदास जी निम्बार्क मतचे अनुयायी होती, केवळ वेळेनुसार त्यांच्या मनात भागवतच्या भक्तीमुळे गोपीभाव निर्माण झाला. तेच हावभाव त्यांना प्रभुच्या भक्तीसाठी उपयुक्त वाटला. त्यामुळेच त्यांनी एक स्वतंत्र संप्रदायाची स्थापना केली होती. त्यांच्यानुसार कोणत्याही प्रकारच्या ज्ञानात जीवन रुपी भवसागराला पार करण्याची क्षमता नसते. केवळ प्रेमच अशी भावना आहे, जी या भवसागरापासून मुक्ती देऊ शकतो. त्यामुळेच आपण अस्तित्वाला विसरुन प्रभुच्या प्रेम रसात बुडून त्यांची स्तुती करावी.

- Advertisement -

‘जिन भेषा मोरे ठाकुर रीझैं, सो ही भेष धरूंगी’ ठाकुरजी ची पूजा म्हणजेच कृष्णाच्या पूजेवेळी सुद्धा हाच भाव सखींच्या मनात असतो. येथे सखी सुद्धा साधु असतात आणि अन्य साधुंच्या उलट ते एक साधारण चोळी घालून रंगबिरंगी वस्र धारण करतात. यांच्या आयुष्यातील सकाळ ही कृष्णाच्या ध्यानाने सुरु होते आणि रात्र ही त्यानेच संपते. या सखी आपल्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत श्रृंगार करतात. त्यांचे केवळ एक उद्देश असते कृष्णावर प्रेम करणे. यांच्या श्रृंगारात वैवाहिक आयुष्याची निशाणी सुद्धा असते. जसे सिंदूर, मंगळसुत्र, पैजण अशा सर्व गोष्टींव्यतिरिक्त लिपस्टिक, साडी, ब्लाउज, काजळ, टिकली सुद्धा लावली जाते. कान्हाला स्वामी आणि स्वत:ला राधेची दासी मानाऱ्या सखी त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एखाद्या वैवाहिक स्री प्रमाणे सोळा श्रृंगार करतात. ऐवढेच नव्हे तर रजस्वलेच्या प्रतीक रुपात स्वत:ला तीन दिवसांपर्यंत अशुद्ध मानतात.

संप्रदाय ठरवतो टिळा लावण्याची पद्धत
सर्वसामान्यपणे सर्व संप्रदायात त्यांची स्वत:ची ओळख ही त्यांच्या कपाळाला लावलेल्या टिळ्यावरुन असते. त्यानंतर त्यांचे वस्र, गुरु रामानंगी संप्रदायातील साधु सुद्धा आपल्या कपाळावर लाल टिळा लावतात. कृष्णानन्दी संप्रदायाचे साधु सफेद रंगाचा टिळा, जी राधेच्या नावाने टिकली म्हणून लावली जाते त्याचसोबत तुळशीची माळ ही घालतात.

दीक्षा घेतल्यानंतर होऊ शकतात सखी
असेच कोणीही सखी होऊ शकत नाही. यासाठी एक विशेष प्रक्रिया सुद्धा केली जाते जी सोप्पी नसते. यावेळी व्यक्ती प्रथम हा साधु बनतो. साधु बनण्यासाठी गुरुच माळ अन्य गोष्टी देऊन त्यांना मंत्र देतात. त्याचसोबत साधुंच्या जीवनात ज्यांना कोणाला सखी व्हायचे आहे त्यांनाच गुरुची साडी आणि श्रृंगार देत सखीची दीक्षा देतात. निर्मोही आखाड्याशी जोडल्या गेलेल्या सखी संप्रदायाचे साधु अथवा सखी कृष्णासमोर नाचून, सुंदर नटून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

सखी संप्रदायात केवळ पुरुषच हा स्री म्हणजेच सखी होऊ शकतो. सखी संप्रदाय हा मनोरंजन नसून केवळ कृष्णावर निर्मळ मनाने केलेले प्रेम असते. सखी संप्रदायातील सखी खासकरुन उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा आणि गोवर्धन येत राहतात.

 


हेही वाचा- तुमचे पितर तुमच्यावर नाराज असल्याची ‘ही’ आहेत लक्षणं

- Advertisment -

Manini