Tuesday, May 21, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा । इयां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥
हे धनुर्धरा, नारद, ध्रुव, अक्रुर, शुक आणि सनत्कुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे.
तैसाचि गोपिकांसि कामें । तया कंसा भयसंभ्रमें । येरां घातकां मनोधर्में । शिशुपालादिकां ॥
तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने व शिशुपालादिकांना वैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे.
अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवो पां भलतेनि मार्गें । भक्ती कां विषयविरागें । अथवा वैरें ॥
अरे, मी निर्वाणीचे स्थान आहे, म्हणून मला वाटेल त्या मार्गाने भक्तीने, विषयबुद्धीने, विरक्ततेने अथवा वैराने कोणीही प्राप्त झाला असता हरकत नाही.
म्हणौनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझ्या ठायीं । उपायांची नाहीं । वाणी एथ ॥
म्हणून पार्था हे पाहा की, मला येऊन मिळण्याकरिता येथे उपायाची उणीव नाही.
आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाची ॥
आणि वाटेल त्या जातीत जन्म होवो आणि माझी भक्ती करो अथवा वैर करो, परंतु भक्ती किंवा वैर जे करावयाचे, ते माझेच करावे.
अगा कवणें एकें बोलें । माझेपण जर्‍ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥
अरे कोणत्याही निमित्ताने जर मला कोणी शरण आला, तर मद्रूप होणे हे अगदी त्याच्या हातचे आहे.
यालागीं पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥
यास्तव हे अर्जुना पापयोनीत जन्म घेतलेले किंवा वैश्य, शूद्र, स्त्रिया यांनी माझी भक्ती केली असता ती माझ्या स्वरूपाप्रत प्राप्त होतात.
मग वर्णांमाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार । मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥
मग स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनामगावच आणि जे मंत्रविद्येचे माहेरघरच, जे सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण.

- Advertisment -

Manini