हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. श्रावण पौर्णिमा देखील तितकीच खास आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या दिवशी देखील केलेले उपाय आपल्याला आयुष्यात सुख-समृद्धी, यश मिळवून देतात. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी साजरे केले जात असून 30 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे पाच ग्रह मिळून पंच महायोग निर्माण करत आहेत. या 5 ग्रहांमुळे बुधादित्य, वसरापती आणि षष्ठ योग देखील निर्माण होत आहेत. असा योग जवळपास 700 वर्षानंतर निर्माण झाला आहे. त्यामुळे या दिवशी सुखी आयुष्यासाठी काही चमत्कारी उपाय नक्की करा.
श्रावण पौर्णिमेला करा खास उपाय
- श्रावण पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समाधान येऊन येते. या दिवशी पिवळे वस्त्र , धान्य एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे.
- श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि जीवनात सुख-समृद्धी येईल.
- वास्तुदोषांमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहतील.
- या दिवशी घरात गायीचे गोमुत्र शिंपडावे.
- श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करावा. नारळ देखील देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे.
- या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करावी आणि सत्यनारायण कथेचे वाचन करावे.
- Advertisement -
हेही वाचा :
Raksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला का साजरे केले जाते रक्षाबंधन?
- Advertisement -
- Advertisement -