Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Religious 'या' रहस्यमय किल्ल्यात गायब झाली लग्नाची वरात

‘या’ रहस्यमय किल्ल्यात गायब झाली लग्नाची वरात

Subscribe

भारत एक असा देश आहे, ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात अशीच काही अनोखी पौराणिक मंदिरं देखील आहेत. ज्याबाबत अनेक अनोख्या घटना सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्यमय किल्ल्याची गोष्ट सांगणार आहोत जिथून लग्नाची संपूर्ण वराच अचानक गायब झाली होती.

ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील झाशीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या गडकुंदर किल्ल्यातील 11 व्या शतकात बांधलेला हा किल्ला पाच मजल्यांचा आहे. हा किल्ला सुमारे 1500 ते 2000 वर्षे जुना असून त्याचे तीन मजले वर दिसतात, तर दोन मजले जमिनीच्या खाली आहेत. हा किल्ला नक्की केव्हा कोणी बांधला याबाबत कोणालाही ठाऊक नाही. या ठिकाणी चंदेल, बुंदेल आणि खंगार यांसारख्या अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले होते.

- Advertisement -

किन रहस्यों से भरा है गढ़कुंडार का किला - mystery of garhkundar fort | Navbharat Gold

गडकुंदरचा किल्ला हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधला असून तो पाहून अनेकांचा गोंधळ उडतो. हा किल्ला 4-5 किलोमीटर अंतरावरूनही पण जवळ आल्यावर तो दिसत नाही. गडकुंदरचा हा किल्ला भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांपैकी एक आहे. येथील स्थानिक लोकांच्या मते, खूप वर्षांपूर्वी जवळच्या गावातील लग्नाची वरात या ठिकाणी आली होती. यातील काही लोक किल्ल्यातील तळघरात गेले आणि अचानक गायब झाले. त्यांचा शोध आजपर्यंत लागला नाही. त्यानंतर या किल्ल्याचे सर्व दरवाजे देखील बंद झाले.

- Advertisement -

अजब-गजब:कहानी भारत के एक रहस्यमय किले की, जहां से अचानक गायब हो गई थी पूरी बारात - Interesting Facts About Mysterious Garh Kundar Fort Where Suddenly Disappeared Entire Baraat - Amar Ujala

असं म्हटलं जातं की, किल्ल्यात खजिन्याचे रहस्य देखील दडलेले आहे, ज्याच्या शोधात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येथील राजांना सोने-हिरे-दागिन्यांची कमतरता नव्हती, असे इतिहास तज्ञ सांगतात. अनेकांनी येथे खजिना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी झाले.


हेही वाचा :

भारतातील ‘या’ रहस्यमय मंदिरात रात्री जाण्यास घाबरतात लोक

- Advertisment -

Manini