Sunday, October 1, 2023
घर मानिनी Religious 'या' रहस्यमय मंदिरातील देव चक्क 16 दिवस पडतो आजारी

‘या’ रहस्यमय मंदिरातील देव चक्क 16 दिवस पडतो आजारी

Subscribe

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात अशीच काही अनोखी पौराणिक मंदिरं देखील आहेत. ज्याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. श्री कृष्णांनी अनेक काळ वास्वव्य केलेल्या वृंदावनाबाबत आजही अनेक रहस्य सांगितली जातात. असेच एक मंदिर म्हणजे वृंदावनचे जगन्नाथ मंदिर. या मंदिरात दरवर्षी एक विचित्र घटना घडते.

या मंदिरातील देव पडतो दरवर्षी 16 दिवस आजारी

Jai Radhe Jai Krishna Jai Vrindavan | Picture gallery, Lord jagannath,  Krishna

- Advertisement -

देव आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतो. देवाच्या भक्तीने व्यक्तीचे विचार सात्विक होतात. देवाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होते. पण सर्व भक्तांचे दुःख दूर करणारा हा देव आजारी देखील पडतो. हे वाचून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल पण ही गोष्ट तितकीच खरी आहे. खरंकर, भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वृंदावनात असे एक मंदिर आहे, जिथे देव स्वतः आजारी पडतो. यावेळी तो भाविकांना दर्शनही देत नाही. वृंदावनाच्या या जगन्नाथ मंदिरात विराजमान झालेले भगवान जगन्नाथ दरवर्षी 16 दिवस आजारी पडतात. हे जगन्नाथ मंदिर वृंदावनच्या ग्यांगुडाडी, परिक्रमा रोडजवळ आहे. ओडिशातील पुरीप्रमाणे येथेही श्री जगन्नाथ रथयात्रा काढली जाते, परंतु भगवान जगन्नाथ दरवर्षी या यात्रेपूर्वी आजारी पडतात.

आंघोळीनंतर देव आजारी पडतो

भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना जगन्नाथ रथयात्रेच्या 16 दिवस आधी मंदिरात देशभरातील पवित्र नद्या आणि समुद्राच्या पाण्याने स्नान केले जाते, ज्यामुळे देव आजारी पडतो. त्यानंतर ते काही दिवस विश्रांती घेतात. या काळात त्यांना औषध दिले जाते. मग 16 दिवसांनी ते पूर्णपणे बरे होतात. यादरम्यान, भाविकांना त्यांचे दर्शन करता येत नाही. 16 दिवसांनंतर भगवान निरोगी झाल्यावर त्यांना दूध-दही आणि तूपाचा अभिषेक केला जातो. त्यानंतर गाय माता जगन्नाथाचे दर्शन घेते आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडले जातात.


हेही वाचा :

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी करा ‘या’ नियमांचे पालन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini