Monday, May 29, 2023
घर मानिनी Religious उपवास करण्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

उपवास करण्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

Subscribe

जर तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास पकडायला सुरूवात केली. तर त्याचा तुम्हाला नक्की चांगला परिणाम पाहायला मिळेल, शिवाय तुम्ही जर धार्मिक विचारांचे असाल तर, तुम्हाला या उपवासामुळे संबंधीत देवतांचे आर्शिवाद सुद्धा प्राप्त होतील.

आजकाल अनेकजण लठ्ठपणाने त्रस्त आहेत. अनियमीत आहार, अपूर्ण झोप आणि व्यायाम करण्याचा आळस यांमुळे लठ्ठपणा निर्माण होऊ लागला आहे. अशावेळी जर तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास करण्यास सुरूवात केली. तर त्याचा तुम्हाला नक्की चांगला परिणाम पाहायला मिळेल, शिवाय तुम्ही जर धार्मिक विचारांचे असाल तर, तुम्हाला या उपवासामुळे संबंधीत देवतांचे आर्शिवाद सुद्धा प्राप्त होतील.

उपवास पकडण्याचे वैज्ञानिक फायदे

  • उपवासामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते, उपवासाच्या काळात आपले शरीर स्वतःला Heal करते, ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. तसेच उपवासा दरम्यान गॅस, जळजळ आणि कफ यांसारखे त्रास ही आपल्याला होत नाहीत.
  • आठवड्यातून एकदा उपवास करत राहिल्याने शरीरातील साठलेले कोलेस्ट्रॉल कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने शरीरातील हृदय रोगाचा धोका कमी होऊ लागतो.
  • उपवासामुळे शरीरातील इम्युनिटी मजबूत होते, तसेच उपवासात आपण जास्त जेवण करत नाही. त्यामुळे आपले वजन कमी व्हायला मदत होते.शिवाय उपवासामुळे शरीर चपळ होते.
  • उपवासामुळे ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर नावाचे प्रोटिन निर्माण होते. या प्रोटिनमुळे तुमच्या मेंदुची गती वाढण्यासाठी मदत होते.

उपवास पकडण्याचे धार्मिक फायदे

- Advertisement -


आपल्याकडे उपवास पकडण्याची परंपरा पौराणिक काळापासून चालू आहे. लोक आपल्या आवडत्या देवतेची किंवा ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी आठवड्यातील एका विशिष्ट दिवशी उपवास पकडतात. ज्यामुळे शरीरात एक सकारात्मकता येते. शिवाय उपवासा दरम्यान आपण देवतेची पूजा- आराधना, मंत्राचा उच्चार करतो. ज्याचे आपल्याला अनेक सकारात्मक फायदे पाहायला मिळतात.


हेही वाचा : 

‘या’ राशीच्या व्यक्तींनी कधीही वापरू नये कासवाची अंगठी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini