30 वर्षानंतर शनि देवांचा कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ४ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल चांगला नफा

कुंभ राशीतील लोकांवर शनीच्या राशीतील बदलाचा सकारात्मक परिणाम होईल.

the transit of saturn in his favorite zodiac sing aquarius will be special for 4 zodiac there may be increase wealth
30 वर्षानंतर शनिदेवांचा कुंभ राशीत प्रवेश; या ४ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगला नफा

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रहाचे राशीत परिवर्तन होते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. यात न्याय देवता शनिदेव आता आपल्या राशी परिवर्तन करणार आहेत. शनि देवाचे हे राशी परिवर्तन 29 एप्रिल रोजी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, तब्बल 30 वर्षांनंतर शनि देवांचे राशी परिवर्तन होणार आहे. यादरम्यान शनिदेव स्वत;च्या राशीत अर्थात कुंभ राशीत प्रवेश करतील. मात्र शनि देवांच्या कुंभ राशी प्रवेशामुळे या 4 राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. जाणून घेऊ या 4 राशी नेमक्या कोणत्या आहेत.

मेष :

कुंभ राशीतील लोकांवर शनीच्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक परिणाम होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. नवीन नोकरीही मिळू शकते. हे परिवर्तन व्यावसायिकांसाठीही उत्तम आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल आहे. कारण नवीन वर्षात शनीची साडेसती किंवा शनी पिढा तुमच्यावर राहणार नाहीत. शनीच्या प्रभावाने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा बॉस तुमचे काम पाहून खूश होतील.

वृषभ :

या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा राशी बदल फलदायी ठरेल. तसेच नवीन वर्षात शनीची साडेसाती तुमच्यावर राहणार नाही. 29 एप्रिल रोजी कुंभ राशीत शनिचे परिवर्तन होताच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळू शकते. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा अंमल आहे आणि शुक्रासोबत शनिदेवाची मैत्री आहे. त्यामुळे या काळात तुमची अनेक स्वप्ने पूर्ण होतील. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.

सिंह:

सिंह राशीच्या लोकांनाही शनीच्या राशीत बदलाचा फायदा होणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी देखील करू शकता. नोकरदार लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. जे राजकारणात आहेत, त्यांच्य़ासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो, त्यांना मोठे पद मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल, या काळात तुमचे प्रत्येक काम पूर्ण होताना दिसते.

धनु :

कुंभ राशीत शनिचे परिवर्तन होताच धनु राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच, शनिदेव तुम्हाला जाता जाता श्रीमंत बनवू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. एकूण आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. या वर्षी तुम्ही कोणतीही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता.


vel amavasya : मराठवाड्यात ‘वेळ अमावस्ये’चा उत्साह; वेळ अमावस्या म्हणजे काय, कशी साजरी होते?