घरभक्तीमाघी गणेश जयंतीला असणार 'हे' 3 शुभ योग; जाणून घ्या मुहूर्त

माघी गणेश जयंतीला असणार ‘हे’ 3 शुभ योग; जाणून घ्या मुहूर्त

Subscribe

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. यंदा 25 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. या दिवशी 3 शुभ योग देखील बनणार आहेत.

गणेश जयंती तिथी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारी, मंगळवारी दुपारी 3:22 पासून सुरु होणार असून 25 जानेवारी, बुधवार दुपारी 12: 34 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, 25 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल.

- Advertisement -

शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, 25 जानेवारी रोजी शुभ मुहूर्त सकाळी 11:29 पासून दुपारी 12:34 पर्यंत असेल.

3 शुभ योग

- Advertisement -

vf5v2tpरवि योग : 25 जानेवारी सकाळी 7:13 ते 8:05 पर्यंत असेल.
शिव योग : 25 जानेवारी सकाळी 8:05 ते 11:10 पर्यंत असेल.
परिघ योग : 25 जानेवारी पहाटेपासून ते 6:16 पर्यंत असेल.

गणेश जयंती का साजरी केली जाते?
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने उटण्याने श्री गणेशांची निर्मिती करुन त्यांची प्राण प्रतिष्ठा केली होती. त्यावेळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी होती. त्यामुळे हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो.


हेही वाचा :

वसंत पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -