घरभक्तीशनी देवांना प्रिय आहे 'हे' एक फूल; अर्पण केल्यास होतील तुमच्यावर प्रसन्न

शनी देवांना प्रिय आहे ‘हे’ एक फूल; अर्पण केल्यास होतील तुमच्यावर प्रसन्न

Subscribe

धार्मिक मान्यतेनुसार, जर शनिवारी शनी देवांची विधीवत पूजा करत त्यांना त्यांच्या आवडीचे फुल अर्पण केल्यास ते अधिक प्रसन्न होतात.

हिंदू धर्मामध्ये शनी देवांना न्याय आणि सत्याची देवता मानले जाते. असं मानलं जात की, शनी देव प्रत्येक व्यक्तिला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जे लोक चांगले कर्म करतात, त्यांच्यावर शनी देव नेहमीच प्रसन्न असतात. तसेच जे लोक वाईट कर्म करतात, त्यांच्यावर शनीचे अशुभ फळ पाहायला मिळते. शनी देवांच्या रागाला फक्त मनुष्यच नाही,तर देवी-देवता सुद्धा घाबरतात.

शास्त्रामध्ये शनिवारचा दिवस शनीदेवांना समर्पित केला आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा-आराधना केल्यास शनी देवाची कृपा होते. धार्मिक मान्यतेनुसार, जर शनिवारी शनी देवांची विधीवत पूजा करत त्यांना त्यांच्या आवडीचे फुल अर्पण केल्यास ते अधिक प्रसन्न होतात.

- Advertisement -

शनी देवांना प्रसन्न करा ‘हे’ उपाय

  • ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची क्रूर दृष्टी, साडेसाती आणि महादशा-अंतर्दशा व्यक्तिला उद्धस्त करू शकतात. त्यामुळेच प्रत्येकजण यापासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात.

  • शनिवारी शनी देवांना त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्यास शनी पीडा कमी व्हायला मदत होते. असं म्हणतात की शनी देवांना रूईचे फुल अत्यंत प्रिय आहे. शनी देवांच्या पूजेवेळी रूईच्या फुलांचा वापर केल्यास शनी देव प्रसन्न होतात.
  • शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी देवांसमोर राईच्या तेलाचा दिवा लावा.
  • शनिवारी हनुमान चालीसेचे पठण करा. तसेच या दिवशी हनुमानाची देखील पूजा करा. ज्यामुळे शनी देवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल.

हेही वाचा :Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी दिवशी अशी करा गणेश मूर्तीची स्थापना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -