माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये ‘या’ देवींची केली जाते पूजा

आजपासून (रविवार 22 जानेवारी) माघ महिन्याची सुरुवात झाली असून गुप्त नवरात्रीची देखील सुरुवात झाली आहे. वर्षात एकूण 4 नवरात्री असतात. त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि 2 नवरात्री गुप्त असतात. चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात. तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्तपूर्ण मानले जाते. तसेच या काळात देवीची पूजा-आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

माघ गुप्त नवरात्री 2023 शुभ मुहूर्त

22 जानेवारी पासून 30 जानेवारी 2023 पर्यंत माघ गुप्त नवरात्री साजरी केली जाईल.
22 जानेवारीला पहाटे 2.22 मिनिटांपासून ते रात्री 10.27 पर्यंत असेल.

गुप्त नवरात्रीमध्ये ‘या’ देवीची केली जाते पूजा

चैत्र आणि अश्विनच्या नवरात्रीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तर गुप्त नवरात्रीमध्ये काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, चिन्नमस्ता, भैरवी, ध्रुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या देवींची पूजा तंत्र साधनेसाठी केली जाते.

नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

  • हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका. शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात. फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा.
  • नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये. नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही.
  • नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मासांहार करू नये. नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते.
  • नवरात्रीच्या काळात घर स्वच्छ ठेवा.

हेही वाचा:

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय