घरभक्तीउत्तराखंडातील गंगोलीहाट येथे सापडली ही महाकाय गुहा ; गुहेत शेषनागासह अनेक देवी-देवतांचे...

उत्तराखंडातील गंगोलीहाट येथे सापडली ही महाकाय गुहा ; गुहेत शेषनागासह अनेक देवी-देवतांचे चित्र

Subscribe

आपल्या भारत देश अनेक प्राचीन रहस्यांनी वेढलेला आहे, त्यापैकी अनेक रहस्य वारंवार आपल्या समोर येतात. इतकंच नाही तर, या रहस्यांच्या माध्यामातून आपल्याला अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी देखील समजतात. आता अशाच एका सर्वात मोठ्ठ्या रहस्यमय गुहेचा शोध लागलेला आहे.

खरंतर ही गुहा उत्तराखंडातील गंगोलीहाट या ठिकाणी सापडली आहे. ही गुहा खूप पुरातन असून, या गुहेच्या आतमधील दृश्य सुद्धा अत्यंत भयानक आहेत. या गुहेच्या आतमध्ये एक शिवलिंग सुद्धा असल्याच सांगितले जात आहे. शिवाय शिवलिंगावर पाण्याचे थेंब सुद्धा पडत आहेत. हे दृश्य ज्यांनी पाहिले ते आश्चर्यचकित झाले आहेत. सांगण्यात येतय की, ही गुहा ८ तळाची असून यामध्ये अनेक पौराणिक चित्रसुद्धा आहेत.

- Advertisement -

पाताळ भुवनेश्वरपेक्षा मोठी गुहा
उत्तराखंडमध्ये सापडलेल्या या गुहेबाबत सांगण्यात येतय की, ही गुहा पाताळ भुवनेश्वरपेक्षा देखील मोठ्ठी आहे. या गुहेमध्ये एक शिवलिंगसुद्धा आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, या शिवलिंगावर खडकांवरून पाणी सुद्धा पडत आहे. या गुहेच्या रहस्याबरोबरच येथील शिवलिंगावर पडणाऱ्या पाण्याची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात होत आहे. तसेच या गुहेला ‘महाकालेश्वर’ हे नाव दिलं जात आहे, या गुहेत शेषनागासह अनेक देवी-देवतांचे चित्र दिसून येत आहेत.

या ४ युवकांनी लावला या गुहेचा शोध
गंगोलीहाटमधील सिद्धपीठ कालिका मंदिराच्या जवळ एक किमी अंतरावरील असलेला या गुहेचा शोध ४ युवकांनी घेतला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी गंगोलीहाटच्या गंगावली वंडर्स ग्रुपमधील सुरेंद्र स‍िंह बिष्ट, ऋषभ रावल, भूपेश पंत आणि पप्पू रावल या चौघांनी जेव्हा ती महाकाय गुहा पाहिली, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. ते या गुहेमध्ये २०० मीटरपर्यंत गेले, त्यानंतर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पायऱ्यांनी ते या गुहेच्या ८ तळ खाली गेले. या गुहेमध्ये ९ वे तळ सुद्धा होते, परंतु ते तिथे जाऊ शकले नाहीत.

- Advertisement -

 

हेही वाचा :Surya Grahan 2022 : शनिश्चरी अमावास्येला असेल ‘या’ वर्षाचे पहिले सूर्यग्रहण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -