वास्तू शास्त्रामध्ये झाडं-रोपटी आणि फुलं यांच्याबाबत अनेक नियमांबाबत सांगण्यात आले आहे. वास्तू शास्त्रानुसार घराच्या आजूबाजूच्या परिसरात फुलांची रोपटी लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. शिवाय यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते. फुलांच्या रोपट्यांमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेकजण घर बाहेरून सुंदर दिसावे यासाठी घराबाहेर वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुल झाडं लावतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका चमत्कारी फुलाबाबत सांगणार आहोत जे तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल.
आर्थिक संकटातून बाहेर काढेल जास्वंदीचे फुल
- Advertisement -
- जास्वंदीचे फूल देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. म्हणूनच यांची पूजा-आराधना करताना जास्वंदीचे फुल अर्पण केले जाते.
- दररोज देवघरातील देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ लाल जास्वंदीचे फुल अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते.
- 11 शुक्रवार देवी लक्ष्मीला लाल जास्वंदीच्या फुलांची माळ घालावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.
- नोकरी-व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना लाल जास्वंदीचे फुल देखील अर्पण करा.
- कुंडलीतील सूर्य आणि मंगळ ग्रह कमजोर असल्यास पूर्व दिशेला लाल जास्वंदीचे झाड लावावे.
हेही वाचा :