ज्योतिष आणि वास्तु शास्त्रात (Vastu Tips) प्रत्येक गोष्टी मागे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. वास्तू शास्त्रात घरासंबंधित अनेक उपाय सांगितले जातात. ज्यात घरातील स्वयंपाकघर आणि त्यातील अनेक गोष्टींचा समावेश आहे. आपण स्वयंपाक घरात दररोज पोळी बनवण्यासाठी पीठ मिळतो. पण अनेकजण पीठ मळताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. असं म्हणतात, या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास घराच्या आर्थिक स्थितीपासून ते आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होतो.
पीठ मळताना करा ‘या’ नियमांचे पालन
- हिंदू शास्त्रानुसार, कधीही अंघोळ न करता अन्न बनवू नये. त्यामुळे नेहमी आंघोळ केल्यावरच पीठ मळून घ्या.
- पीठ मळताना तांब्याच्या गडूमध्ये पाणी घ्यावे. कारण हे अन्न देवाला अर्पण केले जाते आणि देवाचे भोजन बनवताना तांब्याचे भांडे वापरणे शुभ असते. असे केल्याने घरात आशिर्वाद राहतात आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहते.
- नेहमी तेवढंच पीठ घ्या जेवढी गरज आहे. राहिलेलं पीठ सतत फ्रीजमध्ये ठेवणं आणि नंतर त्याचा वापर केल्याने कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
- Advertisement -
- वास्तू शास्त्रानुसार, फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ घरात नकारात्मक ऊर्जा वाढवते. यामुळे पितृदोषही वाढतो. कोणत्याही कारणास्तव पीठ जास्त वेळ मळून घ्यावे लागत असेल तर झाकण ठेवावे.
- जेव्हा तुम्ही कणीक मळाल त्यावेळी मळलेल्या कणकेत तुमच्या बोटांचे ठसे उमटवा. जेणेकरुन ते पिंडदानाच्या गोळ्यासारखे वाटणार नाही. नाहीतर त्याचा पितृदोष तुम्हाला लागू शकतो.
- कणीक मळल्यानंतर त्यावर लगेच काहीतरी झाकण ठेवा. नाहीतर, नकारात्मक ऊर्जा त्यावर लगेच हावी होते.
हेही वाचा :
Vastu Tips : घरातील ‘या’ 2 दिशेला कधीही लावू नका आरसा; नाहीतर व्हाल कंगाल
- Advertisement -
- Advertisement -