Thursday, May 25, 2023
घर मानिनी Religious अपरा एकादशीचे महत्त्व; अशा प्रकारे करा श्री विष्णूंची पूजा

अपरा एकादशीचे महत्त्व; अशा प्रकारे करा श्री विष्णूंची पूजा

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हटले जाते. आज (15 मे) रोजी अपरा एकादशीचे व्रत केले जाईल. अपरा एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. अपरा एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. या दिवशी तुळस, चंदन आणि गंगाजलाने श्री विष्णूंची पूजा करावी.

अपरा एकादशी पूजा विधी

Vijaya Ekadashi 2021 Date, Shubh Muhurat, Puja Vidhi and Significance

- Advertisement -

अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.

घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.

- Advertisement -

पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.

भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

अपरा एकादशीला करु नका ‘या’ चूका

भगवान विष्णु (संरक्षक और रक्षक) - हिंदू भगवान - GoBookMart

 

  • एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते.अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.
  • शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी कधीही भात खाऊ नये. असं म्हणतात की, जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते. त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा आर्शिवाद मिळत नाही. एकादशीच्या भात खाणं पाप मानले जाते.
  • एकादशीच्या दिवशी कधीही मीठ खाऊ नये, अधवा कमी प्रमाणात खावे.
  • शास्त्रानुसार, एकादशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा.
  • एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ, वांगे, मूळा, कांदा , लसूण यांचे सेवन करणे टाळावे.

हेही वाचा : शुक्रवारी कधीही करू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर लक्ष्मीची होईल अवकृपा

- Advertisment -

Manini