घरभक्तीआज आहे जया एकादशी; सुख-समृद्धीसाठी करा 'हा' उपाय

आज आहे जया एकादशी; सुख-समृद्धीसाठी करा ‘हा’ उपाय

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. आज (1 फेब्रुवारी) रोजी जया एकादशीचे व्रत केले जाईल. जया एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. जया एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

जया एकादशी मुहूर्त
एकादशी प्रारंभ : 31 जानेवारी, मंगळवार, रात्री 11:53 पासून
एकादशी समाप्त: 1 फेब्रुवारी, बुधवार, दुपारी 2:01 पर्यंत
त्यामुळे एकादशीचे व्रत आजच केले जाईल.

- Advertisement -

जया एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

Saphala Ekadashi 2022 | saphala ekadashi puja vidhi सफलता एकादशी, साल के अंत में सफलता दिलाने वाली एकादशी, मुहूर्त और महत्व जानें

- Advertisement -
  • जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

जया एकादशीला लावा तुळशीचे रोपटे

Holy Basil: Benefits for Your Brain and Your Body
श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोपटे लावल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात. शिवाय तुळशीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. एकादशीच्या दिवशी तुळस लावल्याने घरात सुख-शांती निर्माण होते.


हेही वाचा : 

Vastu Tips : घरातील मंदिरामध्ये काढा ‘ही’ 3 शुभचिन्हं; नकारात्मकता होईल दूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -