घरभक्तीआज आहे सोमप्रदोष; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

आज आहे सोमप्रदोष; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. शास्त्रात प्रदोष व्रताचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. 17 एप्रिल म्हणजेच आज प्रदोष व्रत आहे. आज सोमवार असल्यामुळे या प्रदोष व्रताला सोमप्रदोष म्हटले जाते. सोमवारी प्रदोष व्रत आल्यावर त्याचे महत्त्व आणखी वाढते. या व्रताच्या प्रभावाने चंद्र त्याचे शुभ फल देतो. प्रदोष व्रत महादेवांना समर्पित आहे. या दिवशी उपवास आणि त्यांची भक्ती केल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.

सोम प्रदोष व्रत तिथी आणि शुभ मुहूर्त

  • सोमवार : 17 एप्रिल 2023 आज दुपारी 3:46 पासून ते
  • मंगळवार  :  18 एप्रिल 2023 दुपारी 1:27 पर्यंत असणार आहे.
  • सोमप्रदोष व्रताची पूजा वेळ संध्याकाळी 06:48 ते रात्री 09:01 पर्यंत असेल.

सोम प्रदोष पूजा विधी :

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. दिवसभर भगवान शंकरांचे स्मरण करत उपवास करण्याचा संकल्प करा.
  • दिवसभर फक्त फळाहार किंवा दुधाचे सेवन करा. संध्याकाळी स्वच्छ होऊन पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करा.
  • घरातील पूजा घर स्वच्छ करून भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करा. सर्वप्रथम पिंडीवर जल अर्पण करा. त्यानंतर सफेद फुलं, बेल, धतूरा, चंदन, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा.
  • देवासमोर धूप, दिप प्रज्वलित करा. भगवान शंकरांच्या मंत्रांचा जाप करा.
  • प्रदोष व्रताच्या कथेचे पठन करा. भगवान शंकरांची आरती करा.

सोमप्रदोष व्रता केल्याने मनोकामना पूर्ण होतात

Som Pradosh Vrat: 21 नवं. को है सोम प्रदोष व्रत, ऐसे करें भोलेनाथ की पूजा

 

- Advertisement -

त्रयोदशी तिथीचे व्रत प्रदोष काळात पूजा केली जाते म्हणून याला प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्याने मोग आणि मोक्ष प्राप्त होतो. जर प्रदोष तिथी सोमवारी आली तर त्या तिथीला सोम प्रदोष व्रत म्हणतात आणि जर प्रदोष तिथी मंगळवारी आली तर तिला भौम प्रदोष व्रत म्हणतात. संतान होण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोम प्रदोष तिथीचे व्रत करावे, असे मानले जाते. पौराणिक मान्यता सांगते की प्रदोष तिथीला भगवान शिव कैलास पर्वताच्या रजत भवनात नृत्य करतात आणि त्या वेळी सर्व देवी-देवता त्यांची स्तुती करतात.


हेही वाचा :

Buddha Purnima 2023 : कधी आहे बौद्ध पौर्णिमा? या दिवशी असेल वर्षातील पहिले चंद्रग्रहण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -