Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious श्रावणी सोमवार आणि सोमप्रदोष एकाच दिवशी; आज शुभ मुहूर्तावर करा महादेवाची पूजा

श्रावणी सोमवार आणि सोमप्रदोष एकाच दिवशी; आज शुभ मुहूर्तावर करा महादेवाची पूजा

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. शास्त्रात प्रदोष व्रताचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. 28 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज प्रदोष व्रत आहे. आज सोमवार असल्यामुळे या प्रदोष व्रताला सोमप्रदोष म्हटले जाते. सोमवारी प्रदोष व्रत आल्यावर त्याचे महत्त्व आणखी वाढते. त्यात सध्या श्रावण महिना देखील सुरु आहे. त्यामुळे आजचा सोमप्रदोष खास असणार आहे. प्रदोष व्रत महादेवांना समर्पित असून हे व्रत केल्याने चंद्राचे शुभ फळ मिळतात. या दिवशी उपवास आणि त्यांची भक्ती केल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.

सोम प्रदोष व्रत तिथी आणि शुभ मुहूर्त

सोमवार : 28 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 06:22 पासून ते
मंगळवार : 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 02:47 पर्यंत असेल.
सोमप्रदोषाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:48 ते रात्री 09:02 पर्यंत असेल.

सोम प्रदोष पूजा विधी :

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. दिवसभर भगवान शंकरांचे स्मरण करत उपवास करण्याचा संकल्प करा.
  • दिवसभर फक्त फळाहार किंवा दुधाचे सेवन करा.संध्याकाळी स्वच्छ होऊन पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करा.
  • घरातील पूजा घर स्वच्छ करून भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करा. सर्वप्रथम पिंडीवर जल अर्पण करा.
  • त्यानंतर सफेद फुलं, बेल, धतूरा, चंदन, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा.
  • देवासमोर धूप, दिप प्रज्वलित करा. भगवान शंकरांच्या मंत्रांचा जाप करा.
  • प्रदोष व्रताच्या कथेचे पठन करा. भगवान शंकरांची आरती करा.

सोमप्रदोष व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात

- Advertisement -

Sawan 2023: Here's Why This Year's Shravan Maas Is Utmost Special And Rare

त्रयोदशी तिथीचे व्रत प्रदोष काळात पूजा केली जाते म्हणून याला प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्याने मोग आणि मोक्ष प्राप्त होतो. जर प्रदोष तिथी सोमवारी आली तर त्या तिथीला सोम प्रदोष व्रत म्हणतात आणि जर प्रदोष तिथी मंगळवारी आली तर तिला भौम प्रदोष व्रत म्हणतात. संतान होण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोम प्रदोष तिथीचे व्रत करावे, असे मानले जाते. पौराणिक मान्यता सांगते की प्रदोष तिथीला भगवान शिव कैलास पर्वताच्या रजत भवनात नृत्य करतात आणि त्या वेळी सर्व देवी-देवता त्यांची स्तुती करतात.

- Advertisement -

 


हेही वाचा :

कुंडलीतील अशुभ चंद्रामुळे वाढतो मानसिक ताण; करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini