हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. तसेच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध, बेल, फळ, सफेद फुलं, धतूरा अर्पण करतात. मात्र, या सर्वात एक महत्त्वाची गोष्ट भगवान शंकरांना अर्पण केली जाते. ती म्हणजे शिवामूठ पौराणिक मान्यतेनुसार, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ(पांढरे), मूग, जव यांपैकी एक-एक धान्य शिवामूठ म्हणून वापरले जाते. आज 4 सप्टेंबर 2023 रोजी श्रावणातला तिसरा सोमवार आहे.
- तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून मूग वापरले जातात. असं म्हणतात हिरवे मूग शिवपिंडीवर अर्पण केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात.
- भगवान शंकराला मूग अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.
- असं म्हणतात मूगावर देवी लक्ष्मीचा वास असतो. भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारे मूग अर्पण केल्याने घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते.
- तसेच या उपायाने आपल्या कुटुंबामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरचा भासत नाही.
शिवामूठ वाहताना ‘या’ मंत्राचा जप करावा.
ॐ नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने । शृंगिभंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे ।।
- Advertisement -
हेही वाचा :
सप्टेंबरमध्ये होणार मोठे बदल ‘या’ 4 राशींवर असणार लक्ष्मीची कृपा
- Advertisement -
- Advertisement -