हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करतात. आज 28 फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जात आहे.
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
संकष्टी चतुर्थी प्रारंभ : 28 फेब्रुवारी मध्यरात्री 01:53 पासून
संकष्टी चतुर्थी समाप्ती : 29 फेब्रुवारी मध्यरात्री 04:18 पर्यंत
चंद्रोदय आज रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी होणार आहे.
चंद्रोदयानंतर करा पारण
हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडला जातो. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतर बाप्पाची पूजा केली जाते. आज
अशी करा बाप्पाची पूजा
- आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला शेंदूर अर्पण करा. सोबतच दूर्वा देखील अर्पण करा.
- आर्थिक लाभासाठी श्री गणेशाला नियमीत पूजा केल्याने दूर्वा अर्पण करा. सोबतच इदं दुर्वादलं ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा.
- संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश अथर्वशीर्षष्याचे पठण करा. यामुळे बाप्पा खूश होतात.
- कर्जापासून मुक्ती मिळावी यासाठी बाप्पाला गूळ आणि तूप अर्पण करा. यामुळे नक्कीच कर्ज कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा :