Sunday, December 3, 2023
घरमानिनीReligiousसंकष्टी चतुर्थीला मुलांच्या भाग्योदयासाठी करा 'हे' चमत्कारी उपाय

संकष्टी चतुर्थीला मुलांच्या भाग्योदयासाठी करा ‘हे’ चमत्कारी उपाय

Subscribe

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करतात. आज 2 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जात आहे.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थी प्रारंभ : 2 ऑक्टोबर सकाळी 07:36 पासून ते
संकष्टी चतुर्थी समाप्ती : 3 ऑक्टोबर सकाळी 06:11 पर्यंत असणार आहे.
चंद्रोदय आज रात्री 08 वाजून 38 मिनिटांनी होणार आहे.

- Advertisement -

चंद्रोदयानंतर करा पारण

हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडला जातो. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतर बाप्पाची पूजा केली जाते.

संकष्टीला करा ‘हे’ उपाय

- Advertisement -

मुलांच्या भाग्योदयासाठी

मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घाला.

धन लाभासाठी

धन लाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा. बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा.

मुलांच्या आरोग्यासाठी

मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पा समोर चार मुखी दीवा लावा. तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि “वक्रतुण्डाय हुं “ या मंत्राचा 108 वेळा जप करा.

 


हेही वाचा :

 

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात का केले जाते भरणी श्राद्ध?

- Advertisment -

Manini