हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. तसेच श्रावण महिन्यामध्ये पडणाऱ्या प्रदोष व्रताचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. 12 सप्टेंबर रोजी श्रावणातील दुसरे प्रदोष व्रत असेल. या दिवशी मंगळवार असल्यामुळे या प्रदोष व्रताला भौम प्रदोष या नावाने ओळखले जाते. अशावेळी या दिवशी भगवान शंकरांसोबतच, मंगळागौरीचे व्रत आणि भगवान हनुमानाची पूजा केल्याने देखील विशेष फळ प्राप्त होते. पौराणिक मान्यतेनुसार, जे व्यक्ती भौम प्रदोषाचे व्रत करते. त्या व्यक्तिला कर्जापासून मुक्ति मिळते. तसेच त्या व्यक्तिचे आरोग्य देखील चांगले राहते.
भौम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त
या महिन्याच्या प्रदोष व्रताची त्रयोदशी तिथी 11 सप्टेंबर रोजी रात्री 11:52 वाजता सुरू होईल आणि 13 सप्टेंबर रोजी पहाटे 2:21 वाजता समाप्त होईल. 12 सप्टेंबर 2023 रोजी भौम प्रदोष व्रत केले जाईल.
पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.30 ते 8.49 पर्यंत असेल.
भौम प्रदोष पूजा विधी
- या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- दिवसभर भगवान शंकरांचे स्मरण करत उपवास करण्याचा संकल्प करा.
- दिवसभर फक्त फळाहार किंवा दुधाचे सेवन करा.
- संध्याकाळी स्वच्छ होऊन पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करा.
- घरातील पूजा घर स्वच्छ करून भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करा.
- सर्वप्रथम पिंडीवर जल अर्पण करा.
- त्यानंतर सफेद फुलं, बेल, धतूरा, चंदन, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा.
- देवासमोर धूप, दिप प्रज्वलित करा.
- भगवान शंकरांच्या मंत्रांचा जाप करा.
- प्रदोष व्रताच्या कथेचे पठन करा.
- भगवान शंकरांची आरती करा.