घरभक्तीश्री विष्णूंआधी एका राक्षसासोबत झाले होते तुळशीचे लग्न; जाणून घ्या 'या' मागची...

श्री विष्णूंआधी एका राक्षसासोबत झाले होते तुळशीचे लग्न; जाणून घ्या ‘या’ मागची पौराणिक कथा

Subscribe

हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या महिन्यातील देवउठनी एकादशीला चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. तसेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीसोबत श्री विष्णूंचा विवाह देखील केला जातो. द्वादशीला सुरु झालेला तुळशी विवाह पुढचे पाच दिवस सुरु असतो. यंदा 5 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह संपन्न झाला.

पौराणिक कथांनुसार, तुळशीचे लग्न श्री विष्णूंसोबत करण्याआधी एका राक्षसाबरोबर झाले होते. असं म्हणतात की, पूर्व जन्मात तुळस एका राक्षस कुळात जन्मली होती. तिचे नाव वृंदा होते. वृंदा श्री विष्णूंची परम भक्त होती. योग्य वयात आल्यावर वृंदाचा विवाह जलंधर राक्षसासोबत करण्यात आले. जेव्हा जलंधर देवतांसोबत युद्ध करत होता त्यावेळी पतीच्या विजयासाठी वृंदा अनुष्ठान करु लागली. या व्रताच्या प्रभावाने जलंधर देवतांवर विजय मिळवू लागला. यावेळी सर्व देवता श्री विष्णूंकडे पोहोचले आणि त्यांच्याकडे प्रार्थना केली.

- Advertisement -

तेव्हा भगवान विष्णूंनी जलंधरचे रुप धारण केले आणि ते वृंदाच्या महालात गेले. पतीला पाहिल्यावर वृंदा चटकण उठली आणि त्यामुळे वृंदाचा संकल्प तुटला. या प्रकारामुळे वृंदाने श्रीविष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. मात्र, तो पर्यंत देवतांनी जलंधरचा वध केला. जलंधरच्या मृत्यूनंतर वृंदाने श्री विष्णूंना दिलेला शाप मागे घेतला आणि ती सती झाली. त्यानंतर तिच्या राखेतून एक रोपटं उगवलं ज्याचे नाव तुळस ठेवण्यात आलं. तेव्हापासून श्रीविष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीचा उपयोग करण्यात आला.

 

- Advertisement -

हेही वाचा :

कार्तिक पौर्णिमेच्या श्री विष्णूंसोबत करा देवी लक्ष्मीची देखील पूजा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -