Wednesday, November 27, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसी आघवियांचि भूतमात्रीं। एकपणें जया मैत्री।
कृपेशीं धात्री। आपणचि जो॥
त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने संपूर्ण प्राणिमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वत: कृपेची जन्मभूमी असतो.
आणि मी हे भाष नेणें। माझें काहींचि न म्हणे।
सुख दुःख जाणणें। नाहीं जया॥
आणखी ‘मी तू’ अशी भाषा ज्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदु:खाची जाणीव नसते.
तेवींचि क्षमेलागीं। पृथ्वीसि पवाडु आंगीं।
संतोषा उत्संगीं। दिधलें घर॥
त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे.
संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः॥
सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझे ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहे असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे.
वार्षियेवीण सागरू। जैसा जळें नित्य निर्भरु।
तैसा निरुपचारु। संतोषी जो॥
वर्षाऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी भरलेला असतो, तसा जो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने पूर्ण भरलेला असतो.
वाहूनि आपुली आण। धरी जो अंतःकरण।
निश्चया साचपण। जयाचेनि॥
जो अंत:करणाला आपली शपथ घालून आवरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो.
जीवू परमात्मा दोन्ही। बैसऊनि ऐक्यासनीं।
जयाचिया हृदयभुवनीं। विराजती॥
ज्याच्या अंत:करणरूपी घरात जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत.
ऐसा योगसमृद्धि। होऊनि जो निरवधि।
अर्पी मनोबुद्धी। माझ्या ठायीं॥
अशा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो.
आंतु बाहेरि योगु। निर्वाळलेयाहि चांगु।
तरी माझा अनुरागु। सप्रेम जया॥
अंत:करणात आत्मैक्यप्रचितीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांद्वारे चांगल्या तर्‍हेने योगात तयार होऊनदेखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते.

- Advertisment -

Manini