Monday, December 30, 2024
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

शास्त्रांचिये सोयरिके। विचळिजे येणेंचि एकें।
याचेनि एकवंकें। जगासि वादु॥
शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एकनिश्चयाच्या संबंधाने जगात वादविवाद चालू आहेत.
तोंडेसीं तोंडा न पडे। बोलेंसीं बोला न घडे।
इया युक्ती बडबडे। त्राय जाहली॥
एकाचा निर्णय दुसर्‍याच्या निर्णयाशी जुळता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसर्‍या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. त्या युक्तीने बडबडीला जोर आला आहे.
नेणों कोणाचें हें स्थळ। परि कैसें अभिलाषाचें बळ।
जे घरोघरीं कपाळ। पिटवीत असे॥
हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे, त्यास आपापल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष आहे त्याचे बल कसे आहे पाहा, की या निर्णयासंबंधाचा अभिलाष घरोघर याचाच काथ्याकूट करावयास लावतो.
नास्तिका द्यावया तोंड। वेदांचें गाढें बंड।
दे देखोनि पाखांड। आनचि वाजे॥
आता नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरिता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करावयास लागले.
म्हणे तुम्ही निर्मूळ। लटिकें हें वाग्जाळ।
ना म्हणसी तरी पोफळ। घातलें आहे॥
तो पाखंडी वेदास असे म्हणतो की, तुम्ही निर्मळ आहात व तुमचे शब्दपांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे खरे नाही असे जर कोणी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी ठेवली आहे.
पाखांडाचे कडे। नागवीं लुंचिती मुंडे।
नियोजिली वितंडें। ताळासि येती॥
पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा विधी करतात (व वेदोक्त कर्म मात्र ते निंदतात). त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जाग्यावर येतात.
मृत्युबळाचेनि माजें। हें जाल वीण काजें।
तें देखोनियां व्याजें। निघाले योगी॥
मृत्यूच्या तडाक्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्यानिमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले आहेत.

- Advertisment -

Manini