Monday, December 30, 2024
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आणि इच्छिलिया सांगडें। इंद्रियां आमिष न जोडे।
तेथ जोडे ऐसा जो डावो पडे। तोचि द्वेषु॥
आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी वृत्ती, तिला द्वेष म्हणतात.
आतां यावरी सुख। तें एवंविध देख।
जेणें एकेंचि अशेख। विसरे जीवु॥
आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो.
मना वाचे काये। जें आपुली आण वाये।
देहस्मृतीची त्राये। मोडित जें ये॥
जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते.
जयाचेनि जालेपणें। पांगुळा होईजे प्राणें।
सात्त्विकासी दुणें। वरीही लाभु॥
जे उत्पन्न झाल्यास प्राण पांगळा होतो व सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीने वर जाते.
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती। हृदयाचिया एकांतीं।
थापटूनि सुषुप्ती। आणी जें गा॥
अर्जुना, जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास थापटून निद्रा आणते.
किंबहुना सोये। जीव आत्मयाची लाहे।
तेथ जें होये। तया नाम सुख॥
फार काय सांगावे? जीवाला आत्म्याचा लाभ जेथे प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते त्याला सुख हे नाव आहे.
आणि ऐसी हे अवस्था। न जोडतां पार्था।
जें जीजे तेंचि सर्वथा। दुःख जाणे॥
आणि अर्जुना अशी स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे.
तें मनोरथसंगें नव्हे। एर्‍हणवीं सिद्धी गेलेंचि आहे।
हे दोनीचि उपाये। सुखदुःखासी॥
ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी ते स्वत: सिद्ध आहेच. हे दोनच उपाय सुखदुःखाला कारणीभूत आहेत.
आतां असंगा साक्षिभूता। देहीं चैतन्याची जे सत्ता।
तिये नाम पंडुसुता। चेतना येथें॥
अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे, तिला चेतना हे नाव आहे.

- Advertisment -

Manini