Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें ।
तरी सांगितले कोणाचे । विलास हे? ॥
आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे?
काइ शाखा नव्हे तरु? । जळेंवीण असे सागरु? ।
तेज आणि तेजाकारु । आन काई? ॥
फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय?
अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर? ॥
कीं रसु आणि नीर । सिनानीं आथी? ॥
शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय?
म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव ।
ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥
म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. (वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत).
जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें ।
तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि कीं ॥
ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे.
पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तरी कैंची बाहेरी । वोसंडेल? ॥
परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल?
आवडे ते वृत्ती किरीटी । आधीं मनौनीचि उठी ।
मग ते वाचे दिठी । करांसि ये ॥
अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते.
वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई? ।
बींवीण भुईं । अंकुर असे? ॥
याशिवाय जे मनातच नाही, ते वाचेत प्रगट होईल काय? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय?
म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें ।
सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥
हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते (नदीच्या) ओघामध्येे कोठून वाहील? (शरीरातून) जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय?

Manini