Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar Adhyay : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एर्‍हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे ।
जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥
सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे अहाते अहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जिवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो.
जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवूनि न्याल ।
म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे ॥
जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला गीतेला सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे.
कां सर्स्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा ।
तरी गीते मज अवधारा । एकचि गती ॥
अथवा तुम्ही आपाल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल तर गीतेची व माझी एकच गति आहे असे समजा.
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज ।
तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥
फार काय सांगावे ? मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपेकरता मी हे ग्रंथाचे निमित्त केले.
तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे ।
म्हणौनि जी मतांगें । बोलों गेलों ॥
तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.
तंव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला ।
कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज ॥
तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी.
आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु ।
ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं ॥
आणि (जेवीत असताना) घासातील खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणाराला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास उशीर केला तर त्यात जेवणाराचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे.

Manini