Sunday, January 12, 2025
HomeमानिनीRelationshipVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

राया जो निर्मळु। निष्कलंक लोककृपाळु।
शरणागतां प्रतिपाळु। शरण्यु जो॥
हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ आहे, पूर्ण असा आहे, लोकांवर कृपा करणारा असा योग्य आहे, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा आणि शरण जाण्यास योग्य असा तर्कसंगत आहे.
पैं सुरसहायशीळु। लोकलालनलीळु।
प्रणतप्रतिपाळु। हा खेळु जयाचा॥
आणि ज्याची धर्मासंबंधी (धर्मरक्षक म्हणून अशी) कीर्ती सतत उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्यरहित असा आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे आणि जो सदैव बळीच्या अशा बंधनात राहिला आहे.
जो धर्मकीर्तिधवळु। आगाध दातृत्वें सरळु।
अतुळबळें प्रबळु। बळिबंधनु॥
तसेच देवांचे साह्य करणे हा ज्याचा खरा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची अपार लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खरा खेळ आहे.
जो भक्तजनवत्सळु। प्रेमळजन प्रांजळु।
सत्यसेतु सकळु। कलानिधी॥
आणि तो भक्तांविषयी खरंच मायाळू आहे व प्रेमळ जनांना सोपा आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे.
तो श्रीकृष्ण वैकुंठींचा। चक्रवर्ती निजांचा।
सांगे येरु दैवाचा। आइकतु असे॥
तसेच तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे आणि भाग्यवान अर्जुन ते ऐकत आहे.
आतां ययावरी। निरूपिती परी।
संजयो म्हणे अवधारीं। धृतराष्ट्रातें॥
आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार आपण जरा ऐका, असे संजय धृतराष्ट्रास म्हणू लागला.
तेचि रसाळ कथा। मर्हाठिया प्रतिपथा।
आणिजेल आतां। आवधारिजो॥
तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल ती आपण आता जरा शांतपणे ऐकावी.
ज्ञानदेव म्हणे तुम्ही। संत वोळगावेति आम्ही।
हें पढविलों जी स्वामी। निवृत्तिदेवीं॥
महाराज म्हणतात, महाराज, प्रभू निवृत्तीदेवांनी आम्हाला हे शिकवले आहे की, आम्ही तुम्हा संतांची सतत सेवा करीत राहावी.

- Advertisment -

Manini