Wednesday, January 8, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नाना कृषीवळु आपुलें। पांघुरवी पेरिलें।
तैसें झांकी निपजलें। दानपुण्य॥
अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो.
वरिवरी देहो न पूजी। लोकांतें न रंजी।
स्वधर्मु वाग्ध्वजीं। बांधों नेणे॥
वरवर देहाची पूजा करीत नाही व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करीत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते.
परोपकारु न बोले। न मिरवी अभ्यासिलें।
न शके विकूं जोडलें। स्फीतीसाठीं॥
आपण दुसर्‍यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करीत नाही. आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही.
शरीर भोगाकडे। पाहतां कृपणु आवडे।
एर्हवीं धर्मविषयीं थोडें। बहु न म्हणे॥
तो आपल्या शरीराला जे भोग देतो त्यावरून अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. याशिवाय धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही.
घरीं दिसे सांकड। देहींची आयती रोड।
परी दानीं जया होड। सुरतरूसीं॥
घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो.
किंबहुना स्वधर्मीं थोरु। अवसरीं उदारु।
आत्मचर्चे चतुरु। एर्‍हुवी वेडा॥
फार काय सांगावे? स्वधर्मामध्ये तो थोर असतो. योग्य प्रसंगी तो उदार असतो. आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो.
केळीचें दळवाडें। हळू पोकळ आवडे।
परी फळोनियां गाढें। रसाळ जैसें॥
केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते.
कां मेघांचें आंग झील। दिसे वारेनि जैसें जाईल।
परी वर्षती नवल। घनवट तें॥
अथवा मेघाचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्‍याने नाहीसे होईल असे वाटते, पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात.

- Advertisment -

Manini