Sunday, January 12, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरि क्षेत्रज्ञु जो एथें। तो मीचि जाण निरुतें।
जो सर्व क्षेत्रांतें। संगोपोनि असे॥
तरी सर्व क्षेत्रांचे पालक असतो असा तो क्षेत्रज्ञ येथे मी आहे हे पक्के समज.
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें। जाणणें जें निरुतें।
ज्ञान ऐसें तयातें। मानूं आम्ही॥
क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो.
तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत्।
स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे शृणु॥
ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त, तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर.
तरि क्षेत्र येणें नावें। हें शरीर जेणें भावें।
म्हणितलें तें आघवें। सांगों अतां॥
आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र नावाने उल्लेख केला, तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो.
हें क्षेत्र का म्हणिजे। कैसें कें उपजे।
कवणाकवणीं वाढविजे। विकारीं एथ॥
याला क्षेत्र का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते.
हें औट हात मोटकें। कीं केवढें पां केतुकें।
बरड कीं पिके। कोणाचें हें॥
हे मोजके साडेतीन हातांचेच आहे अथवा केवढे व कसले आहे? हे क्षेत्र माळजमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे? व कोणाच्या मालकीचे आहे?
इत्यादि सर्व। जे जे याचे भाव।
ते बोलिजती सावेव। अवधान दें॥
इत्यादि जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील, तिकडे लक्ष दे.
पैं याचि स्थळाकारणें। श्रुति सदा बोबाणे।
तर्कु येणेंचि ठिकाणें। तोंडाळु केला॥
याच ठिकाणाकरिता वेदाची नेहमी बडबड सुरू आहे व याच ठिकाणाने तर्काला वाटाघाटी करावयास लावले.
चाळिता हेचि बोली। दर्शनें शेवटा आलीं।
तेवींचि नाहीं बुझविली। अझुनि द्वंद्वें॥
हीच वाटाघाटी करताना सहा दर्शने हातटेकीस आली, तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत.

- Advertisment -

Manini