Saturday, January 11, 2025
HomeमानिनीReligiousVani Dnyaneshwars : वाणी ज्ञानेश्वरांची

Vani Dnyaneshwars : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त ।
मग राखिले शिणत । आणिक जीव ॥
आणि हालचाल करणार्‍या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्‍या जीवांचे रक्षण केले.
अहो वसतीं धवळारें । मोडूनि केलीं देव्हारें ।
नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली ॥
अहो रहाती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून, लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले.
मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें ।
घर मोडोनि केले । मांडव पुढें ॥
डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो, अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले.
नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें ।
जालें आंगधुणें । कुंजराचें ॥ 233 ॥
अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंगधुणे झाले (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो).
नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा ।
इया करणी कीं चेष्टा ? । काइ हसों ॥
बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात ? का याला हसावे?
एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी ।
तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥
कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले.
एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण ।
तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा ॥
कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत (तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नसल्यामुळे) त्यांचे प्राण कासावीस होतात, हीच हिंसा होय.

- Advertisment -

Manini