Sunday, May 19, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥
त्या अक्षरावाचून सोन्यारुप्याला किंमत नाही, तर तेथे राजाज्ञा हीच मुख्य होय व त्याच राजशिक्क्याच्या कातड्याने सर्व वस्तू विकत मिळतात.
तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे । जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥
त्याचप्रमाणे, जेव्हा मन व बुद्धि ही माझ्याच प्रेमाने युक्त होतात, तेव्हाच मोठेपणा व सर्वज्ञपणा यांचा उपयोग होतो.
म्हणौनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥
म्हणून कूळ, जात व वर्ण हे सर्वच निष्कारण आहेत, तर अर्जुना फक्त माझी भक्ती केली असता सार्थक होते.
तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो ॥
ती माझी भक्ती वाटेल त्याने मनोभावाने केली असता, तो पूर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाही.
जैसे तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥
ओढे जोपर्यंत गंगेस मिळाले नाहीत, तोपर्यंतच त्यास ओहोळ, वहाळ वगैरे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात.
कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटे । अग्नीमाजीं ॥
किंवा लाकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत, तोपर्यंतच त्यास खैर, चंदन अशी नावे असतात.
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥
त्याचप्रमाणे जोपर्यंत मद्रूपता प्राप्त झाली नाही, तोपर्यंतच क्षत्रिय, वैश्य, स्त्री, शूद्र, अंत्यज इत्यादी जाती वेगळ्या असतात.

- Advertisment -

Manini