Friday, January 17, 2025
HomeमानिनीReligiousVasant Panchami : आज करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी राशीनुसार करा 'हे' उपाय

Vasant Panchami : आज करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी राशीनुसार करा ‘हे’ उपाय

Subscribe

माघ शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी विद्या आणि ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वती देवीची पूजा केली जाते. सरस्वती देवीची पूजा करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस शुभ मानला जातो. यंदाची वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला (आज) असून या दिवशी सरस्वतीची पूज अर्चा केल्याने विद्या आणि ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच यादिवशी आपल्या राशीनुसार काही उपाय केल्यास शुभ मानले जाते.

राशीनुसार करा ‘या’ गोष्टी

  • मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी या दिवशी सरस्वती कवचाचे स्मरण करणे लाभदायक मानले जाते. यामुळे अभ्यासात बुद्धीमत्ता आणि एकाग्रता मिळवण्यास मदत होते.

  • वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी सरस्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी सरस्वती देवीला पांढरे तिळ अर्पण करावे. त्याचप्रमाणे पांढरी फुले देखील अर्पण करावी.

  • मिथुन

या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला वही-पुस्तक दान करावे. असे केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

  • कर्क

कर्क राशीच्या लोकांनी सरस्वती देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सिंह

सिंह राशीच्या लोकांना या दिवशी 27 वेळा सरस्वती गायत्री मंत्राचा जप करावा. जितका जास्त वेळा या मंत्राचा जप कराल तितका जास्त फायदा होईल.

 

  • कन्या

या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या मुहर्तावावर लहान मुलांना अभ्यासाच्या वस्तूंचे दान करावे. असे केल्यास अभ्यासातील अडथळे दूर होतात.

  • तूळ

तूळ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी ब्राम्हणाला पांढरे कपडे दान करावे. असे केल्यास अनेक समस्या दूर होतात.

  • वृश्चिक

या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची मनोभावे पूजा करावे तसेच तिला मोरपंख अर्पण करावे. असे केल्याने स्मरणशक्ती वाढते.

  • धनु

धनु राशीच्या लोकांनी या दिवशी देवीला पिवळ्या रंगाची मिठाई दाखवावी. असे केल्याने शिक्षणातील अडथळे दूर होतात.

  • मकर

वसंत पंचमीच्या दिवशी गरीब लोकांना पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे असे केल्यास बुद्धीचा विकास होतो.

  • कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी शाळेच्या मुलांना दप्तरे आणि शाळेच्या गरजेच्या वस्तू दान करावे. असे केल्याने सरस्वती देवीची कृपा होते.

  • मीन

मीन राशीच्या व्यक्तींनी या दिवशी गरजू मुलींना पिवळ्या रंगाच्या वस्त्र दान करावे, असे केल्याने त्यांच्या करिअरमधील समस्या दूर होतात.

 


हेही वाचा :

वसंत पंचमीला करा ‘या’ वस्तूंचे दान; देवी सरस्वती होतील प्रसन्न

Manini