Monday, May 29, 2023
घर मानिनी Religious Vastu Shastra : कोणत्या दिशेला असावा घराचा मुख्य दरवाजा; जाणून घ्या शुभ-अशुभ...

Vastu Shastra : कोणत्या दिशेला असावा घराचा मुख्य दरवाजा; जाणून घ्या शुभ-अशुभ प्रभाव

Subscribe

वास्तू शास्त्रात प्रत्येक दिशाचे महत्त्व सांगितले जाते. ज्यात घरातील स्वयंपाक घरापासून ते घराच्या मुख्य दरवाजापर्यंत अनेक गोष्टींबाबत सांगितले जाते. आपल्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण व्यतिरिक्त कोणत्याही दिशेला असेल तर वास्तुनुसार सर्वांचे वेगवेगळे परिणाम होतात. घराची स्थितीही दाराच्या दिशेवरून ठरते. आज आम्ही तुम्हाला मुख्य दरवाजाची कोणती दिशा शुभ तर कोणती दिशा अशुभ असते हे सांगणार आहोत.

Main Door Vastu 2023 - Vastu Tips for Entrance, Direction, Size & Design

- Advertisement -

खरंतर पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण या 4 मुख्य दिशा असतात. मात्र, वास्तू शास्त्रात मुख्य दिशा तसेच त्याच्या उपदिशांचे महत्त्व देखील सांगितले जाते.

मुख्य दरवाजाचे शुभ-अशुभ प्रभाव

Front Door Stock Photo - Download Image Now - Door, Front Door, House - iStock

  • पूर्व
- Advertisement -

वास्तू शास्त्रात, पूर्व दिशेचा दरवाजा सर्वोत्तम मानला जातो. या दिशेला दरवाजा असल्याने घरामध्ये सूर्याचा प्रखर प्रकाश येतो. जेणेकरुन घरातील नकारात्मकता नष्ट होते.

  • पश्चिम

वास्तू शास्त्रात, पश्चिमेचा दरवाजा मिश्र फळ देणारा मानला जातो. हा दरवाजा कुटुंबातील पुरुषांसाठी फारसा उत्तम मानला जात नाही.

  • उत्तर

उत्तर दिशेला देव दिशा मानले जाते. या दिशेचा मुख्य दरवाजा शुभ मानला जातो. या दिशेला मुख्य दरवाजा असल्यास अशा घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

  • दक्षिण

वास्तू शास्त्रात दक्षिणेचा दरवाजा फारसा चांगला मानला जात नाही. या दिशेला दरवाजा असल्यास कुटुंबातील व्यक्तिंना सतत आजार, कर्ज, अपघात यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Main Entrance Door Design for Indian Household

  • ईशान्य

पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये ईशान्य दिशा असते. या दिशेचा दरवाजा सुख-समृद्धी, शांती आणि आनंद देणारा असतो.

  • वायव्य

उत्तर आणि पश्चिमेच्या मध्ये वायव्य दिशा आहे. या दिशेचा दरवाजा मिश्र परिणाम देणारा मानला जातो.

  • नैऋत्य

दक्षिण आणि पश्चिमेच्या मधील दिशा नैऋत्य दिशा आहे. या दिशेचा दरवाजा फारसा चांगला मानला जात नाही. या दिशेला दरवाजा असल्याने घरात सतच अनेक अघटित घटना घडतात.

  • आग्नेय

पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये आग्नेय दिशा असते. या दिशेचा दरवाजा फारसा चांगला मानला जात नाही. हा दरवाजा प्रगती रोखतो. अशा घरात सतत आर्थिक नुकसान होते.


हेही वाचा : 

Vastu Tips : देवघरात ‘या’ 3 गोष्टी कधीही ठेऊ नये

- Advertisment -

Manini