Thursday, April 25, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : स्टोअर रुम कोणत्या दिशेला असायला हवी?

Vastu Tips : स्टोअर रुम कोणत्या दिशेला असायला हवी?

Subscribe

भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्राला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. वास्तू जर योग्य दिशेस नसेल तर अनेकांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. आपल्यापैकी अनेकांच्या घरात स्टोअर रुम असते. स्टोअर रुम म्हणजे भविष्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींची साठवण करून ठेवण्याची जागा, याठिकाणी रेशन, धान्य या साहित्यांसह घरातील न वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा देखील समावेश असतो.

 स्टोअर रुम कोणत्या दिशेस असू नये?

Store Rooms: Everything you Need to Know

  • जर तुमच्या स्वयंपाक घरातसुद्धा स्टोअर रूम असेल तर पती-पत्नीमध्ये सतत भांडणं, अनावश्यक खर्च यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
  • स्टोअर रुम कधीही पैसे ठेवण्याच्या जागी म्हणजेच उत्तर दिशेस नसावे, कारण यामुळे धनहानी होऊ शकते. तसेच करिअरमध्ये प्रगती होण्यास अडथळे येतात.
  • घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्टोअर रूम असेल, तर घराचा प्रमुख व्यक्ती प्रवासावर अधिक खर्च करू शकतो.
  • स्टोअर रुम घराच्या पूर्व दिशेस असल्यास सामाजिक नातेसंबंध बिघडतात, शिवाय अशा घरातील व्यक्तीचे अनेक शत्रू निर्माण होतात.
  • नैऋत्य दिशेस स्टोअर रूम असल्यास घरातील वृद्धांना आजारांचा सामना करावा लागू शकतो.

 स्टोअर रुम कोणत्या दिशेस असावी?

  • घराच्या पश्चिमेस स्टोअर रुम असल्यास विद्यार्थ्यांना करिअरमध्ये लाभ प्राप्त होतो.
  • घराच्या वायव्य दिशेस स्टोअर रुम असल्यास आर्थिक परिस्थिती मजबूत होते शिवाय घरातील व्यक्तींना मान-सन्मान प्राप्त होतो.
  • स्टोअर रुम देवघराच्या समोर किंवा बाजूला असल्यास घराचा प्रमुख व्यक्ती ईमानदार आणि बुद्धिमान असतो.
  • घराच्या हॉलमध्ये किंवा त्याच्या आस-पास स्टोअर रुम असेल तर घरातील सदस्य बुद्धिमान असतात.

हेही वाचा :

Vastu Tips : कर्ज वाढलंय? करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini