येत्या काही दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. पुढील वर्ष उत्तम जावं असं प्रत्येकालाच वाटतं. येत्या वर्षात आपल्यावर देवी लक्ष्मींचा हात असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी वास्तू शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे नव्या वर्षात तुम्हाला कोणतीच कमतरता भासणार नाही. सोबतच प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळवता येईल.
घराच्या प्रवेश दारावर लावा ‘ही’ एक गोष्ट
- धार्मिक शुभ चिन्ह
घराच्या मुख्य प्रवेश दारावर स्वास्तिक, ऊँ यांसारखे सकारात्मक शुभ चिन्ह लावल्यास वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो.
- घोड्याची नाळ
वास्तू शास्त्रात घोड्याची नाळ खूप लाभकारी मानली जाते. घोड्याची नाळ सौभाग्याचे प्रतीक असते. घरामध्ये हे लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
- तांब्याचा सूर्य
वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर तांब्याचा सूर्य लावणं शुभ मानले जाते. असं म्हटलं जातं की, हे घरामध्ये लावल्याने घरात सुख-समृद्धीचा टिकून राहते. तसेच कुंडलीतील सूर्य ग्रह देखील मजबूत होतो.
हेही वाचा :