हिंदू धर्मात कापूर, धूप, दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अनेक काळापासून या परंपरा चालू आहेत. कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं.मात्र फक्त कापूरच नाही तर कापूराबरोबर अनेकजण लवंग सुद्धा जाळतात. कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने तुमच्या घरातील अनेक प्रकारचे वास्तूदोष दूर होतात. इतकचं नाही तर घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळणं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चांगलं मानलं जातं. तुम्हाला आश्चर्यच वाटेल परंतु, कापूर आणि लवंगचा वापर अनेक औषधांच्या निर्मितीमध्येही सुद्धा वापरला जातो.
घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कापूर आणि लवंगचे ‘हे’ उपाय करून पहा
- वास्तु शास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता भासत असेल किंवा तुमचे पैसे कुठे बाहेर अडकले असतील तर एका चांदीच्या वाटीमध्ये लवंग आणि कापूर जाळा. हा उपाय दररोज केल्याने तुमच्या घरात धन-धान्याची वाढ होईल.
- एका लाल कपड्यात एक लवंग गुंडाळून ठेवा. हे काम शुभ तिथीवर लक्ष्मी पूजना नंतर करा. या उपायाने देखील तुम्हाला धन-धान्याची कमतरता भासणार नाही.
- सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी कापूराने देवतांची आरती करा. ही आरती करताना कापूराबरोबर 2 लवंग घ्या. या उपायाने घरात सुगंध पसरुण घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. शिवाय घरातील क्लेश सुद्धा कमी होतात.
- Advertisement -
- घरात आनंदाचे वातावरण राहावे यासाठी घराच्या मुख्य दाराबाहेर कापूर आणि लवंग जाळा. या उपायाने घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते.
- देवी लक्ष्मीला खूश करायचे असेल तर देवासमोर लावणाऱ्या दिव्यामध्ये 2 ते 3 लवंग टाकून ठेवा. या उपायाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात निरंतर निवास करतील.
- तुमच्या कामात सतत अडथळे निर्माण होत असतील तर, गणपती बाप्पाला 2 लवंग, वेलची आणि सुपारी एका विड्याच्या पानात बांधून अर्पित करा. या उपायाने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर व्हायला मदत होईल.
हेही वाचा :
Vastu Tips : गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी गुरूवारी करा हळदीचे ‘हे’ सोप्पे उपाय
- Advertisement -
- Advertisement -