आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूचं आपल्या आयुष्यात फार महत्त्व असते. वास्तू शास्त्रानुसार, घरात काही झाडे लावणे शुभ मानले जाते. या झाडांमधून आपल्याला सकारात्मक उर्जा मिळते. तर काही झाडे घरात लावणे अशुभ मानले जाते. वास्तु तज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक झाडाचे वेगळे महत्त्व असते. कोणत्याही झाडाला किंवा वनस्पतीचा योग्य फायदा मिळवण्यासाठी ते रोप योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात काही झाडे लावल्याने वास्तू दोष दूर होऊ शकतात तर घरात चुकीच्या पद्धतीने झाडे लावल्यास घरात नकारात्मकता निर्माण होऊ शकते. याचा आपल्या घरात चांगला वाईट परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, घरात झाडे लावण्याआधी काही खास टिप्स नक्की पाहा.
- घरात चुकूनही काटेरी झाडे लावू नका. काटेरी झाडे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्याचप्रमाणे ही झाडे आपल्या आर्थिक स्थितीवर देखील प्रभाव करतात.
- घराबाहेर अशोक प्लांट लावा. याने घरात संपन्नता येते. तसेच आपापसातील नातेसंबंध सुधारतात.
- घरात आठवणीने तुळशीडे रोपटे लावावे. तुळस ही शुभ मानली जाते. तुळसीला लक्ष्मी समान मानले जाते. त्यामुळे नेहमी पूर्व – उत्तर दिशेला तुळसीचे झाड लावावे. तुळशीमुळे नकारात्मकता दूर होते.
- घरात मनी प्लांटची एक वेल तरी असावी. मनी प्लांटमुळे घरची आर्थिक स्थिती सुधारते. दक्षिण – पूर्व किंवा उत्तर दिशेला मनी प्लांट लावावे. मनी प्लांट लावल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते असे म्हणतात.
- घरावर पिंपळाचे झाड नसावे. पिंपळाच्या झाडामुळे अशुभ सावली आपल्या आसपास फिरते असे वास्तुशास्त्र सांगते. घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास पैशाची कमतरता जाणवते.
- घराच्या आता किंवा बाहेर केळ्याचे झाड लावल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हणतात. उत्तर किंवा ईशान्य दिशेस केळ्याचे झाड लावावे.
- आपल्याकडे अनेकांना घरात निवडुंगाचे झाड शोपीस म्हणून ठेवण्याची सवय असते मात्र निवडुंगाचे झाड घरात नकारात्मक उर्जा निर्माण करते असे म्हणतात.
हेही वाचा :
Vastu Tips : दुसऱ्यांकडे ‘या’ 3 गोष्टी मागितल्याने वाढते दारिद्र्य